ब्रिक्स परिषदेसाठी डोवाल जाणार रशियाला   

युक्रेन संघर्षावर चर्चेची शक्यता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉस्को आणि कीव दौर्‍यानंतर युक्रेन  वादावर तोडगा काढण्यासाठी भारताच्या संभाव्य भूमिकेची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या आठवड्यात रशियाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. मॉस्को आणि कीव यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी शांतता चर्चेसाठी नव्याने जोर दिला जात असताना डोवाल प्रामुख्याने ब्रिस (ब्राझील-रशिया-भारत-चीन-दक्षिण आफ्रिका) गटाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाच्या दौर्‍यावर आहेत. ते या भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्याची शयता आहे.
 
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी गुरुवारी रशियातील व्लादिवोस्तोक शहरात ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये झालेल्या चर्चासत्रात भारत, ब्राझील आणि चीन या संभाव्य मध्यस्थांची नावे दिली होती. रशिया आणि युक्रेन यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करू शकणार्‍या संभाव्य देशांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांनी वेळ न दवडता एकत्र बसून चर्चा केली पाहिजे, असे मोदी म्हणाले. 
 

Related Articles